Sunday, 16 June 2019

हेमाद्री अंक-३ ( शिवराजाभिषेक दिन विशेषांक)


अखंड हिंदुस्तानला अभिमानास्पद असलेला एक सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून सार्वभौम सिंहासनावर विराजमान झाले तोच हा क्षण. ह्याच सुवर्ण क्षणांचे अवचीत्य साधून हेमाद्री च्या तिसऱ्या अंकाचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. शिवराजाभिषेक दिन विशेषांक असलेल्या ह्या अंकात “शिवपूर्वकाळ व शिवकाळ” ह्या विषयावर विविध इतिहास अभ्यासक यांचे लेख, काव्य व ओव्या मोडी हस्तलिखित मोडी वाचकांना उपयुक्त ठरणार आहेत. हेमाद्री पंतानी जोपासलेली लिपी शिवकालात अधिक बहरत गेली, राजाभिषेका नंतर शिवरायांनी निर्माण करून घेतलेला स्वतंत्र शब्दकोश आणि त्यांनीच सुरु केलेला राजाभिषेक शक हे स्वत्वाचे प्रतीकच जणू याची आठवण म्हणून ह्या अंकाचे मुखपृष्ठ शिवरायांच्या एका पत्राने सजवलेला आहे.
हेमाद्री च्या तिसऱ्या अंकाचे प्रकाशन किल्ले रायगडावर संपन्न झालेल्या शिवराजाभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले मा. आ. भरतशेठ गोगावले तसेच श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष श्री सुनील पवार साहेब आणि कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ह्या शुभ मंगल प्रसंगी हेमाद्री अंक-३, शिवराजाभिषेक दिन विशेषांक चे ई- बुक सर्व मोडी वाचकास अर्पण करत आहोत.
हेमाद्री अंक तिसरा- शिवराजाभिषेक दिन विशेषांक
प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम
संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले
सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
निर्मिती सहाय्य : श्री. संदेश सोनावळे
सहाय्यक : मयुरी खरे
मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव  
विषेश आभार : श्री. प्रवीण मोहिते

सदर हस्तलिखित खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

PASSWORD : hemadri3

https://hemadrimodilipi.blogspot.com

FB page: modilipihemadri

Email: hemadri.modilipi@gmail.com

      

Sunday, 7 April 2019

हेमाद्री - अंक २रा

"हेमाद्री" मोडी लिपीतील तैमासिक अंक दुसरा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इतिहास संकलक अप्पासाहेब परब यांच्या हस्ते प्रकाशित...

बहुचर्चित "हेमाद्री" मोडी लिपी मधील हस्त लिखित अंक दुसरा
आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इतिहास संकलक अप्पासाहेब परब यांच्या हस्ते, 'संस्कृती प्रतिष्ठान (ट्रस्ट)' कांजुरमार्ग पूर्व येथे भरविण्यात आलेल्या शस्त्रास्त्र आणि ऐतिहासिक नाणी प्रदर्शन दरम्यान प्रकाशन करण्यात आले.

"हेमाद्री"

हेमाद्री हा मोडिलिपी मधील हस्तलिखित अंक आहे. आपल्या लढवय्या महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हा मोडिलिपी मध्ये लिहिला गेला आहे. पण आजची आणि भावी पिढी पर्यंत ही लिपी पोहोचावी तसेच आज पर्यंत वाचन न झालेल्या इतिहासाचे वाचन करता यावे या उद्देशाने हा अंक सुरू करण्यात आला आहे.

आम्हांला कळविताना आनंद होत आहे की दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद वाढत आहे.

आजच्या डिजिटल युगात मोडीलिपी मधील जास्तीत जास्त मजकूर जर आपण डिजिटल स्वरूपात वाचावयास उपलब्ध केला तर नक्कीच मोडीलिपी चे दिवस बदलतील.

या अंकाची E प्रत जोडताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

हा अंक तुम्ही आमच्या फेसबुक पेज वर तसेच ब्लॉग वर वाचू शकता. तसेच प्रतिक्रिया आणि पुढील अंकासाठी लेख पाठवू शकता.खाली दिलेल्या लिंकवर अंक उपलब्ध आहे.

https://drive.google.com/open?id=1A1sgf-J1FajyJ4X0bT5ByOqHUikxl9y7

https://hemadrimodilipi.blogspot.com

FB page: modilipihemadri

Email: hemadri.modilipi@gmail.com

Tuesday, 12 February 2019

मनोगत


मनोगत

एके दिवशी सहजच व्हॉट्सअॅपच्या समूहा मध्ये मोडीतील   
स्मारानिकेची संकल्पना मांडली आणि त्या दिवशी कोणाचाही तितका  
सा प्रतिसाद आला नाही. पण दुसर्या दिवशी हि संकल्पना हा हा  
म्हणता प्रत्येकाने उचलून धरली आणि वेगाने कमाला सुरु                       
वात झाली. कामगिरी मोठी होती आणि वेळ कमी पण समविचारी 
लढाऊ वृत्तीने सगळ्यांनी ही कामगिरी पार पडायचे ठरवले. प्राथ    
मीक वर्गात आम्ही सगळेच जन अक्षर ओळख शिकलो होतो आणि  
तेच करण ठरलं मोडी प्रेम निर्माण व्हायचे. नुकताच अमचा प्रगत       
वर्ग पार पडला आणि अक्षर ओळखी पासून आम्ही पत्रावाचनावर प्रगती   
केली. पण हे मोडी प्रेम आम्हाला लेख आणि स्मरणिके पर्यंत घेऊन जा 
ईल असं वाटलं नव्हतं. हा प्रवास खचितच स्वप्नवत आहे.संकल्पने   
ला सहभाग आणि सहयोगाची जोड मिळाली आणि स्मारानिकेला मूर्त 
स्वरूप मिळाले.

वेळ कमी असल्यामुळे विषय निवडण्यापेक्षा आम्ही विषय       
निवडून देण्यावर भर दिला. प्रत्येकाच्या आवडीनुसार विषय देण्याचे  
काम संदेश सोनावळे यांनी मनापासून केले. त्या मुळे विद्यार्थ्यां      
चे काम सोपे झाले. बहुतेक विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी पुस्तकांचे    
आणि ग्रंथांचे सहाय्य घेतले जेणे करून लिखाण जास्तीतजास्त अचूक 
माहिती पुरविणारे होईल.


आज कालच्या जगात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मिडिया     
यांना धरून चालणे म्हणजेच प्रत्येका पर्यंत पहोचणे हा सुवर्ण नियम 
झाला आहे. त्या अनुशंघाने स्मरणीकेची डीजीटल कॉपी (PDF) स्वरू 
पात मोडी अभ्य्साकांच्या हाती देताना आनंद होत आहे. हि प्रत जास्ती 
त जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळेच उत्सुक आहेत.

हस्तलिखित अंकाच्या संकल्पनेचा विचार करता अंकाचे शीर्षक     
‘हेमाद्री’ असे ठरले. शीर्षक मोडीच्या परंपरेतले असावे आणि      
मोडीचे आद्य प्रवर्तक हेमाद्री पंत यांची स्मृती त्यातून प्रतीबीं      
बित व्हावी हा उद्देश होता.

भविष्यात ज्या विषयांवर फारसं लेखन झाले नाही ते             
विषय हाताळून जास्तीत जास्त माहिती जनमाणसात प्रसिद्ध होईल  
या सगळ्याकडे कल असेल. हेमाद्री हा अंक तुम्ही जास्तीत जास्त 
लोकांपर्यंत पोहोचवालच पण तुमची प्रतिक्रिया जाणून घ्याय     
ला आवडेल जेणेकरून या पुढेही आम्ही अशा अंकातून नवनवीन   
विषय आपली पर्यंत पोहोचवू शकतो.

मोडी प्रगत वर्ग विद्यार्थी

मकरसंक्रांती, शिवराज शक ३४५  


Sunday, 10 February 2019

पुन्हा जन्मली मोडी - अश्विनी सुर्वे


****पुन्हा जन्मली मोडी****

हेमाद्रीने शोधियली,
इतिहासाने घडवियली
असूनी भाषा मराठीच ती,
लिपी मात्र ती अलंकारली

फारसी असो वा उर्दू-अरबी,
सर्व भाषा घेई ओटी अपुली
यादवी बहमनी असे आद्य ती,
 शिवबानेही दिधली महती

अपुल्या दरबारीही त्याने,
आदराने ती वागविली
पेशव्यांनाही नसे ती त्याज्य,
 पुण्यात वृध्दिंगत केली किर्ती

टोपीकरही ते नवलची करिती,
विनासायास ती ये दफ्तरी
झाला देश हा स्वतंत्र मात्र,
 लिपीच ती तर मोडीयली

रायगडी ये पुन्हा ती शरणा,
 पुनरुज्जीवे चालविली
इतिहासाची अज्ञात पाने,
मोडी लिपीने पुनःप्रसविली......

                                   - अश्विनी सुर्वे

Friday, 25 January 2019

हेमाद्री-अंक १ला


नमस्कार...

मराठ्यांचा इतिहास आणि मोडी लिपी या दोन्ही अज्ञातवासात असलेल्या गोष्टींना पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमानात आणण्याचा आमचा हा एक प्रयत्न! त्या निमित्ताने पौष शु. १४ शके १९४० शिवराज शक ३४५ म्हणजेच रविवारी दिनांक २०.०१.२०१९ रोजी ठाणे ग्रंथ संग्रहालय येथे हेमाद्री ह्या हस्तलिखित पुस्तकाच्या पहिल्या अंकाचे ई-बुक स्वरुपात डॉ. केदारजी फाळके ह्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मोडी लिपीमधुन लिहिलेले विविध विषयावरचे १७ हस्तलिखित लेख ह्या अंकातून अभ्यासाला मिळणार आहेत. सर्व सृजन मोडी वाचक आणि अभ्यासक ह्यांना हे पुस्तक सुपूर्द करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे.

हे पुस्तक आम्ही त्रैमासिक रुपात आणणार आहोत. आपला प्रतिसाद आणि पाठिंबा असेल याची खात्री आहे.

संपादन: श्री. पंकज भोसले
उपसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे

सदर ई-बुक खालील दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

https://drive.google.com/open?id=17OMJG9MZ_3H_NRdNSr0IdMWVlMMC13Nr

एक विनंती.....हे हस्तलिखित वाचून आम्हास खालील ई-मेलवर प्रतिक्रिया नोंदवाव्यात.
hemadri.modilipi@gmail.com