अखंड हिंदुस्तानला
अभिमानास्पद असलेला एक सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून सार्वभौम सिंहासनावर विराजमान झाले तोच हा
क्षण. ह्याच सुवर्ण क्षणांचे अवचीत्य साधून हेमाद्री च्या तिसऱ्या अंकाचे अनावरण
करून लोकार्पण करण्यात आले. शिवराजाभिषेक दिन विशेषांक असलेल्या ह्या अंकात “शिवपूर्वकाळ
व शिवकाळ” ह्या विषयावर विविध इतिहास अभ्यासक यांचे लेख, काव्य व ओव्या मोडी
हस्तलिखित मोडी वाचकांना उपयुक्त ठरणार आहेत. हेमाद्री पंतानी जोपासलेली लिपी शिवकालात
अधिक बहरत गेली, राजाभिषेका नंतर शिवरायांनी निर्माण करून घेतलेला स्वतंत्र शब्दकोश
आणि त्यांनीच सुरु केलेला राजाभिषेक शक हे स्वत्वाचे प्रतीकच जणू याची आठवण म्हणून
ह्या अंकाचे मुखपृष्ठ शिवरायांच्या एका पत्राने सजवलेला आहे.
हेमाद्री च्या तिसऱ्या
अंकाचे प्रकाशन किल्ले रायगडावर संपन्न झालेल्या शिवराजाभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी
उपस्थित असलेले मा. आ. भरतशेठ गोगावले तसेच श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती,
दुर्गराज रायगडचे अध्यक्ष श्री सुनील पवार साहेब आणि कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले
व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ह्या शुभ मंगल प्रसंगी हेमाद्री अंक-३,
शिवराजाभिषेक दिन विशेषांक चे ई- बुक सर्व मोडी वाचकास अर्पण करत आहोत.
हेमाद्री अंक तिसरा-
शिवराजाभिषेक दिन विशेषांक
प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम
संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले
सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
निर्मिती सहाय्य : श्री. संदेश सोनावळे
सहाय्यक : मयुरी खरे
मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव
विषेश आभार : श्री. प्रवीण मोहिते
सदर हस्तलिखित खालील ठिकाणी
उपलब्ध आहे.
PASSWORD : hemadri3
PASSWORD : hemadri3
https://hemadrimodilipi.blogspot.com
FB page: modilipihemadri
Email:
hemadri.modilipi@gmail.com
No comments:
Post a Comment