****पुन्हा जन्मली मोडी****
हेमाद्रीने शोधियली,
इतिहासाने घडवियली
असूनी भाषा मराठीच ती,
लिपी मात्र ती अलंकारली
फारसी असो वा उर्दू-अरबी,
सर्व भाषा घेई ओटी अपुली
यादवी बहमनी असे आद्य ती,
शिवबानेही दिधली महती
अपुल्या दरबारीही त्याने,
आदराने ती वागविली
पेशव्यांनाही नसे ती त्याज्य,
पुण्यात वृध्दिंगत केली किर्ती
टोपीकरही ते नवलची करिती,
विनासायास ती ये दफ्तरी
झाला देश हा स्वतंत्र मात्र,
लिपीच ती तर मोडीयली
रायगडी ये पुन्हा ती शरणा,
पुनरुज्जीवे चालविली
इतिहासाची अज्ञात पाने,
मोडी लिपीने पुनःप्रसविली......
- अश्विनी सुर्वे
Very nicely written. Well explain.
ReplyDelete