हेमाद्री अंक- १४ प्रकाशन
दक्षिण दिग्विजय विशेषांक
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार दक्षिणेतील तंजावर येथ पर्यंत केला. हे करत असताना तेथिल नायक राजांना व इतर राजवाटींना संघटीत करून “दक्षिणियांची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहो” या साठी कार्य केले. पश्चिमकढील राजगडा पासून पुर्व दिशेकडील कावेरी स्थित जिंजी या किल्ल्यावर आपल्या स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. उत्तरेकडून येणाऱ्या धर्मांध इस्लामिक सत्तांना परास्त करण्यासाठी सर्व हिंदू प्रजेसाठी जणू एक भिंतच उभी केली. शिवरायांच्या नंतर किल्ले जिंजी हि स्वराज्याची तिसरी राजधानी झाली. आज दक्षिणेकडील सुबत्ता व समृधता पाहायला मिळते ती मराठ्यांच्या याच पराक्रमामुळे. दक्षिणेतील सांस्कृतिक वारसा, मंदिरे, मंदिर शिल्प, साहित्य, कला हे मराठ्यांच्या या दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे संरक्षित राहू शकले. हेमाद्री अंकाच्या दक्षिण दिग्विजय विशेषांकात याचाच अभ्यासात्मक लिखाणातून विविध अभ्यासकांचे लेख देण्यात आले आहे.
हेमाद्री हस्तलिखित चौदाव्या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे करण्यात आले..
हेमाद्री अंक -१४
दक्षिण दिग्विजय विशेषांक
संपादक व संकल्पना : पंकज भोसले
सहसंपादिका : सौ. ममता भोसले
प्रमुख मार्गदर्शक : सुनील कदम
सहाय्यक : केतकी पाटील
मुखपृष्ठ रचना : श्री.सिद्धेश गुरव
अनुक्रमणिका
१. दक्षिण देशीचे दूरस्थ मराठा साम्राज्य -
तंजावरच्या भोसले घराण्याची नाणी- प्रशांत ठोसर
२. शिवछत्रपतींच्या दक्षिणदिग्विजयातील दुर्गसंपदा
- रविराज पराडकर
३. जिंजी - विक्रमसिंह मोहिते
४. धर्मवीर संभाजी महाराजांचे दक्षिणेतील हिंदू
धर्म जिर्णोद्धाराचे कार्य - डॉ. अशोक बांगर
५. लक्ष्मीनारायण कल्याण मराठीतील आद्य नाटक -
पंकज भोसले
६. तंजावर स्थित सरस्वती महाल ग्रंथालय - केतकी
पाटील
७.
थिरूमलपाडी वैद्यनाथ स्वामी मंदिरातील बैठ्या खेळांचे कोरीव पट - ममता पंकज भोसले
सदर अंक खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे
https://drive.google.com/file/d/11Vb61ru4Wn16MApjHO4ooZguct5-aqo3/view?usp=sharing
हेमाद्री Hemadri ©️
No comments:
Post a Comment