हेमाद्री अंक-१३
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक
हेमाद्रीच्या अंक-१३ या हस्तलिखित विशेषांकात एकूण सात लेख असून या सप्तकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन चरित्रातील विविध पैलू अभ्यासक लेखकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. धर्मासाठी कार्य करत ज्यांनी सांस्कृतिक पुनरुत्थान अग्रस्थानी ठेवलं अशा धर्मपरायण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर हा विशेष अंक आम्हा मोडी वाचकांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरणार आहे. अहिल्यादेवी यांनी ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, श्रावण मास महात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रति तयार करून घेतल्या व हस्तलिखित ग्रंथसंपदेला एक नव संजीवनी प्राप्त करून दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३००व्या जयंतीनिमित्त हेमाद्री या हस्तलिखित विशेषांकाच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवादन.
हेमाद्री अंक-१३
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक
संपादक व संकल्पना : पंकज भोसलेसहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शक : सुनील कदम
सहाय्यक : मयुरी खरे, ममता भोसले
मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव
अनुक्रमणिका
1. सांस्कृतिक पुनरुज्जीवन - डॉ. अशोक बांगर
2. धर्मचारिणी - नवीन म्हात्रे
3. राज्योगिनी - विनिता तेलंग
4. धर्मपरायण अहिल्यादेवी होळकर - ममता नाईक भोसले
5. धनगर जवळा येथील अहिल्याबाई
होळकर बारव शिलालेख - अनिल किसन दुधाणे
6. कार्यकुशल अहिल्यादेवी होळकर - केतकी पाटील गुरव
7. अहिल्यादेवी होळकर – पत्रसार - पंकज भोसले
सदर अंक ई-पुस्तक स्वरुपात खालील संकेत स्थळावर नि:शुल्क प्राप्त होईल
https://drive.google.com/file/d/1WxMn4dz-31HbT6A1ShRS217MUCYRZmdM/view?usp=sharing
https://hemadrimodilipi.blogspot.com/
hemadri.modilipi@gmail.com
©️ Hemadri
No comments:
Post a Comment