श्रीरामनवमी, शालीवाहन शके १९४३ , प्लवनाम संवत्सरे,शिवशक ३४७ , बुधवार, दिनांक २१.०४.२०२१ रोजी हेमाद्री त्रैमासिक मोडी लिपीतील हस्तलिखितचे प्रकाशन करण्यात आले. हे ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि *श्री. निलेश रमेश भिसे (श्री शंभू चरित्र व्याख्याते)* व हेमाद्री अंकाचे प्रमुख मार्गदर्शक *श्री सुनील कदम सर* यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे त्यांनी रचलेला ‘बुधभूषण’ हा ग्रंथ. या ग्रंथाचा इतिहास श्री निलेश भिसे सरांनी त्यांच्या व्याख्यानातून उलघडला.
“महाराज आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालविणे हे आम्हास अगत्य”.... कार्तिक शुद्ध ६ शके १६०३ मधील छत्रपती शंभु महाराज यांनी काशी रंगनाथ देशाधिकारी, क्षेत्र जावळी यांना लिहीलेल्या पत्रातील ही ओळ खूप महत्वाची आहे. छत्रपती शिवरायांच्या प्राणोत्क्रमणा नंतर लिहीलेल्या या पत्रात छत्रपती शंभुजी महाराज हे आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्य कारभार चालवणार होते हे स्पष्ट दिसून येतं. बाल वयापासून ते युवराज पद स्वीकारण्यापर्यन्त आणि त्या ही पुढे छत्रपती म्हणून राज्याचा कारभार हाती घेण्यापर्यंतचा हा प्रवास खड्तर आणि जोखमीचा होता. शंभू छत्रपतींचा हाच जीवन प्रवास आणि अनेक प्रसंग आम्ही हेमाद्री च्या या सहाव्या अंकात संकलित करण्याचा एक प्रमाणिक प्रयत्न केला आहे.
हेमाद्री अंक-६
संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले
सह संपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम
सहाय्यक : मयूरी खरे, प्रवीण मोहिते, संदेश सोनावळे
मुखपृष्ठ रचना : सिद्धेश गुरव
मुखपृष्ट शंभुराई छायाचित्र : श्री.
किरण शेलार
अनुक्रमणिका
१. युवराज शंभुराजे
लेख / हस्ताक्षर : सरिता शिंदे
२. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश
लेख / हस्ताक्षर : भारती धोंडे
पाटील
३. श्री सखी राज्ञी जयति
लेख / हस्ताक्षर : अश्विनी
सुर्वे
४. समर्थ रामदास स्वामींनी
छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेले पत्र
हस्ताक्षर : पंकज भोसले
५. शिवपुत्र संभाजी महाराजांची नाणी
लेख : पुरुषोत्तम भारगवे, किरण
करांडे हसताक्षर : अजय यादव
६. छत्रपती संभाजी महाराजांचे
अष्टप्रधान मंडळ
लेख : सुनील कदम हसताक्षर : अजय यादव
७. शंभू छत्रपतींची बुऱ्हाणपूर
मोहीम
लेख : विश्वास मेस्त्री हसताक्षर : सोनल कदम
८. शिवरायांची बाहेरदेश स्वारी
लेख : जोसेफ लोपेज हसताक्षर : पंकज भोसले
९. शंभुकालीन रायगड
लेख : सात्विक पेणकर हस्ताक्षर : सुलभा कोरडे
१०. संभाजी महाराजांची राजनीती
लेख / हस्ताक्षर : सोनल कदम
११. शिव-शंभू महाराजांचे साहुकार
विषयी धोरण
लेख : प्रवीण मोहिते हस्ताक्षर : सात्विक पेणकर
१२. बुधभूषण भाग-२
लेख / हस्ताक्षर :
पंकज भोसले
सदर अंक ई-बुक च्या स्वरुपात खाली दिलेल्या संकेत स्थळावरून *मोफत* प्राप्त करू शकता
https://drive.google.com/file/d/18WgKRJrl1Ms1IaTOoHQMGeZqCn1Eeh6d/view?usp=sharing
हेमाद्री अंक-६ ची छापील प्रत हवी असल्यास सशुल्क देण्यात येईल त्या साठी खलील क्रमांकावर संपर्क साधावा
संपर्क : 9821009137 (Whatsapp)
E-mail: hemadri.modilipi@gmail.com
https://hemadrimodilipi.blogspot.com
आपल्या
प्रकिक्रिया अवश्य नोंदवा....... धन्यवाद......
No comments:
Post a Comment