हेमाद्री अंक - ११ प्रकाशन
आज अधिक श्रावण शु. १२ शके १९४५, रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी येथे अखंड भारत व्यासपीठ व इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हेमाद्री या मोडी लिपीतील हस्तलिखिताच्या ११व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास संशोधक व अभ्यासक मा. पांडुरंग बलकवडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघ चालक मा. डॉ. सतीश मोढ यांच्या शुभहस्ते हस्तलिखिताचे व ई-पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी अखंड भारत व्यासपीठ चे अध्यक्ष संजय ढवळीकर तसेच शस्त्र संग्रहक, मोडी अभ्यासक श्री सुनील कदम व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट, दादर चे कार्यकारी सदस्य आशिष कदम उपस्थित होते.
हेमाद्री अंक – ११
घोडखिंडीचा रणसंग्राम संपादक / संकल्पना : श्री पंकज भोसले
उपसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शक : श्री सुनील कदम
सहाय्यक : सौ. ममता भोसले, श्री आशिष कदम, ऑ. मयुरी खरे
मुखपृष्ठ रचना : श्री सिद्धेश गुरव
अमुक्रमानिका
1. वीर बाजीप्रभूंचा पोवाडा - स्वातंत्र्यवीर सावरकर
हस्ताक्षर - अजय यादव
२. पन्हाळगडाचा इतिहास - इंद्रायणी मढवी
३. विशाळगडाचा इतिहास - करुणा आगिवले
४. मराठ्यांचा एक अपरिचित विजय संग्राम १४५२ - सुनील कदम
५. शिवा काशिद - सुलभा रानडे
६. बाजीप्रभू देशपांडे - श्वेता फिरके
७. बांदल घराणे - मृणाल गोखले
८. घोडखिंडीतील युद्ध.- कांचन उतेकर
९. विशाळगडाचा वेढा - पंकज भोसले
१०. पन्हाळ गड व्हाया घोडखिंड ते विशाळगड प्रवास - श्रीया शिंदे
सदर अंक ई-पुस्तकाच्या स्वरूपात खालील साकेत स्थळावर नि:शुल्क उपलब्ध आहे
https://drive.google.com/file/d/19qvf3IXz4PMpRFn-nEDOgJ772-7fVkEZ/view?usp=drive_link
आपल्या प्रतिक्रिया व इतर अंक प्राप्त करण्यासाठी संपर्क करा
ईमेल : hemadri.modilipi@gmail.com
संपर्क : ९८२१००९१३७
Web Page : https://hemadrimodilipi.blogspot.com/
हेमाद्री©️