Saturday, 21 December 2024

हेमाद्री अंक-१३

 हेमाद्री अंक-१३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक 

हेमाद्रीच्या अंक-१३ या हस्तलिखित विशेषांकात एकूण सात लेख असून या सप्तकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन चरित्रातील विविध पैलू अभ्यासक लेखकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. धर्मासाठी कार्य करत ज्यांनी सांस्कृतिक पुनरुत्थान अग्रस्थानी ठेवलं अशा धर्मपरायण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर हा विशेष अंक आम्हा मोडी वाचकांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरणार आहे. अहिल्यादेवी यांनी ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, श्रावण मास महात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रति तयार करून घेतल्या व हस्तलिखित ग्रंथसंपदेला एक नव संजीवनी प्राप्त करून दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३००व्या जयंतीनिमित्त हेमाद्री या हस्तलिखित विशेषांकाच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवादन.

हेमाद्री अंक-१३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक 

संपादक व संकल्पना : पंकज भोसले 
सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शक : सुनील कदम 
सहाय्यक : मयुरी खरे, ममता भोसले

मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव



अनुक्रमणिका

1. सांस्कृतिक पुनरुज्जीवन         - डॉ. अशोक बांगर 

2. धर्मचारिणी - नवीन म्हात्रे

3. राज्योगिनी - विनिता तेलंग

4. धर्मपरायण अहिल्यादेवी होळकर - ममता नाईक भोसले

5. धनगर जवळा येथील अहिल्याबाई

       होळकर बारव  शिलालेख - अनिल किसन दुधाणे

6. कार्यकुशल अहिल्यादेवी होळकर - केतकी पाटील गुरव

7. अहिल्यादेवी होळकर – पत्रसार - पंकज भोसले


सदर अंक ई-पुस्तक स्वरुपात खालील संकेत स्थळावर नि:शुल्क प्राप्त होईल 

https://drive.google.com/file/d/1WxMn4dz-31HbT6A1ShRS217MUCYRZmdM/view?usp=sharing

https://hemadrimodilipi.blogspot.com/

hemadri.modilipi@gmail.com

 ©️ Hemadri

Friday, 5 April 2024

हेमाद्री अंक - १२ प्रकाशन

हेमाद्री अंक - १२ प्रकाशन 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विशेषांक 


अखंड भारताच्या हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करून हेमाद्री अंक सादर अर्पण


आसिंधूसिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका

 पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिति स्मृत:


अखंड भारतात जो सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भारत देशाला आपली पितृभूमी मानतो तो हिंदू. या भारतात जे जे वंश विस्तारत गेले आणि मिसळून गेले ते सर्व स्वीकारून त्याला महान स्वरूप देत हिंदू वंश म्हणून जगात प्रसिद्ध झाला ज्या वंशाच्या उत्पत्तीचा धागा थेट वेदकालीन सप्तसिंधूशी जाऊन मिळतो त्या वंशाचे रक्त ज्याच्यत अंगात खेळत आहे तो हिंदू….या हिंदुस्थानाला आपली पुण्यभूमी मानतो तिच्यातच आपले ऋषी, अवतार, आपले धर्मगुरू उत्पन्न झाले असे मानतो आणि हीच माझी श्रद्धाभूमी आणि तीर्थभूमी आहे अशी निष्ठा ठेवतो तो हिंदू. अशा पितृभूमी म्हणजेच आपल्या वाडवडिलांची भूमी मानणारा प्रत्येक जण हिंदू होय…. 


हेमाद्री अंक - १२

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विशेषांक 


संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले

सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे 

प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम

सहाय्यक : सौ. ममता भोसले, श्री. आशिष कदम, श्री. राजेंद्र वराडकर

मुखपृष्ठरचना : श्री. सिद्धेश् गुरव


अमुक्रमानिका

 १. सावरकरांचा जीवनपट - अक्षय जोग

२. सावरकरांचे हिंदुत्व - सात्यकी सावरकर

३. तर मुसलमान १९२१ प्रमाणे पुन्हा हिंदूंवर अत्याचार करतील - रणजीतजी सावरकर

४. अध्यात्मवादी सावरकर - गीता उपासनी

५. सावरकरांचे संन्यस्त खड्ग - रणजीत हिर्लेकर

६. साहित्यातील विनायक धृवतारा - प्रज्ञा दर्भे

७. स्वातंत्रवीर सावरकरांचे क्रांतिकारी कार्य भाषा शुद्धी - सुनिल कदम

मोडी लिपी सुलेखन : अजय यादव, श्वेता फिरके, पंकज भोसले

 सदर अंक ई - पुस्तक स्वरुपात खालील संकेतस्थळावर प्राप्त होईल

https://drive.google.com/file/d/1_8DP6X6zmbiCTQFE86eFbUg_cKaRwJLQ/view?usp=sharing

हेमाद्री ©