Sunday, 30 July 2023

हेमाद्री अंक - ११ प्रकाशन

 हेमाद्री अंक - ११ प्रकाशन

आज अधिक श्रावण शु. १२ शके १९४५, रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी येथे अखंड भारत व्यासपीठ व इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हेमाद्री या मोडी लिपीतील हस्तलिखिताच्या ११व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास संशोधक व अभ्यासक मा. पांडुरंग बलकवडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघ चालक मा. डॉ. सतीश मोढ यांच्या शुभहस्ते हस्तलिखिताचे व ई-पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी अखंड भारत व्यासपीठ चे अध्यक्ष संजय ढवळीकर तसेच शस्त्र संग्रहक, मोडी अभ्यासक श्री सुनील कदम व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट, दादर चे कार्यकारी सदस्य आशिष कदम उपस्थित होते.

हेमाद्री अंक – ११

घोडखिंडीचा रणसंग्राम 

संपादक / संकल्पना : श्री पंकज भोसले 

उपसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे

प्रमुख मार्गदर्शक : श्री सुनील कदम 

सहाय्यक : सौ. ममता भोसले, श्री आशिष कदम, ऑ. मयुरी खरे 

मुखपृष्ठ रचना : श्री सिद्धेश गुरव 

अमुक्रमानिका 

1. वीर बाजीप्रभूंचा पोवाडा - स्वातंत्र्यवीर सावरकर 

हस्ताक्षर - अजय यादव

२. पन्हाळगडाचा इतिहास - इंद्रायणी मढवी

३. विशाळगडाचा इतिहास - करुणा आगिवले 

४. मराठ्यांचा एक अपरिचित विजय संग्राम १४५२ - सुनील कदम

५. शिवा काशिद - सुलभा रानडे

६. बाजीप्रभू देशपांडे - श्वेता फिरके

७. बांदल घराणे - मृणाल गोखले

८. घोडखिंडीतील युद्ध.- कांचन उतेकर

९. विशाळगडाचा वेढा - पंकज भोसले

१०. पन्हाळ गड व्हाया घोडखिंड ते विशाळगड प्रवास - श्रीया शिंदे

सदर अंक ई-पुस्तकाच्या स्वरूपात खालील साकेत स्थळावर नि:शुल्क उपलब्ध आहे 

https://drive.google.com/file/d/19qvf3IXz4PMpRFn-nEDOgJ772-7fVkEZ/view?usp=drive_link

आपल्या प्रतिक्रिया व इतर अंक प्राप्त करण्यासाठी संपर्क करा 

ईमेल : hemadri.modilipi@gmail.com

संपर्क : ९८२१००९१३७ 

Web Page : https://hemadrimodilipi.blogspot.com/

हेमाद्री©️

Monday, 13 February 2023

हेमाद्री’ अंक-१० प्रकाशन

 

हेमाद्री’ अंक-१० प्रकाशन

हेमाद्री या मोडी लिपीतील हस्तलिखित १०व्या अंकाचे प्रकाशन दिनांक ११.०२.२०२३ रोजी ८व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलणात पार पडले. संमेलनाध्यक्ष मा. श्री. प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते हेमाद्री हस्तलिखित अंकाचे व ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामवाचनालय, तलवडे यांच्या वतीने आयोजित या संमेलनात स्वागताध्यक्ष श्री आप्पा साळवी, नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड, मोडी लिपी प्रशिक्षक व इतिहास अभ्यासक श्री सुनील कदम, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, दादर चे श्री आशिष कदम उपस्थित होते.

शिवकाळात मोडी लिपीला राजलिपीचा दर्जा मिळाला, त्या काळातील सर्वाधिक पत्र आपल्याला मोडीलिपी मध्येच पाहायला मिळतात. १२व्या शतकापासून सुरु असलेली मोडी लिपी शिवकाळात अधिक बहरू लागली. बाळाजी आवजी चिटणीस यांच्या सुंदर हस्ताक्षराने पत्र आकर्षक दिसू लागली. राज्यव्यवहारकोष मधील लेखनवर्ग प्रमाणे शिवकालीन लेखन पद्धती सुरु झाली. महजरदानपत्र, आज्ञापत्र, कतबापत्र, जाबिता, करारनामे अश्या प्रकारचे कागद शिवकाळात पाहायला मिळतात. हे सर्व कागद कलमबंद असत. प्रत्येक कलमाच्या शेवटी मर्यादेयं हा शिक्का आढळतो, तसेच तह व ठरावावर शिरोधारी ‘प्रतीपचंद्र’ हि मुद्रा आढळते, डाव्या बाजूस प्रधानाची मुद्रा व शेवटी मोर्तब सुद हि समाप्ती मुद्रा दिसते. पत्राची सुरुवात हिंदू कालगणने नुसार असलेल्या ‘स्वस्ति श्रीराज्याभिषेक शकाने’ होत असे. शिवकाळातील हे बदल कायम ठेऊन शिवकाळानंतर देखील अशीच लेखन पद्धत पाहायला मिळते.

हेमाद्रीच्या या अंकात शिवकाळातील याच वेगवेगळ्या लेखनपद्धतीचा व पत्रांचा अभ्यास दिलेला आहे. कौलनामा, महजर, नाव निशाणी,कतबा या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख देण्यात आले आहेत. सर्व लेखांचे देवनागरी लिप्यंतर देखील या अंकात वाचकांस वाचायला मिळतील. अंक नाविन्यपूर्ण असावा म्हणून या वेळेस एक शोध निबंध समाविष्ट केला आहे. पाली येथील हैबतराव देशमुख यांच्या समाधी वरील हा शोध निंबध श्री संदीप परब यांनी लिहिला आहे. अंक सजवण्यासाठी श्री अजय यादव यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे खूप कौतुक आहे. मुखपृष्ठ रचनाकार श्री सिद्धेश गुरव यांनी अंकाच्या विषयाला साजेसे असे मुखपृष्ठ तयार करून दिल्या बद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. मोडी लिपी प्रशिक्षणात उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या अंकातील लेखांचे मोडी लिपीत लिखाण केले आहे. मोडी लिपीचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत पण हे सर्व सिद्ध करण्यासाठी तुम्हा वाचकांच्या सहकार्याची देखील गरज आहे.

हेमाद्री अंक-१० हस्तलिखित

संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले

सहसंपादिका :सौ. अश्विनी सुर्वे

प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनिल कदम

सहाय्यक : प्रवीण मोहिते, ममता भोसले, मयुरी खरे

मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव  

सदर अंक ई-पुस्तकाच्या स्वरूपात खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे

https://drive.google.com/file/d/1UWMwqi2To1QT41Nn74vKC8xkYefHo-JF/view?usp=share_link

आपल्या प्रतिकृया व इतर अंक प्राप्त करण्यासाठी संपर्क करा.

https://hemadrimodilipi.blogspot.com/

-मेल : Hemadri.modilipi@rediffmail.com

संपर्क : ९८२१००९१३७

Hemadri ©



Tuesday, 24 January 2023

हेमाद्री मोडीलिपीतील हस्तलिखित अंक - ९ प्रकाशन

*हेमाद्री मोडीलिपीतील हस्तलिखित अंक - ९  प्रकाशन*


हेमाद्री या मोडीलिपीतील हस्तलिखिताच्या नवव्या अंकाचे  प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री *मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या हस्ते रविवार दिनांक २२.०१.२०२३ रोजी करण्यात आले. सुयश कला-क्रीडा मंडळ, श्री सिद्धिविनायक मंदिर ठाणे(पूर्व) यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमाला – २०२३ या कार्यक्रमात हा प्रकाशन समारंभ पार पडला. हेमाद्री हस्तलिखिताचा हा ९वा अंक असून सदर अंक विविध आरत्या लिहून संपन्न केला आहे. कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक श्री महेश काळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर, ठाणे महापौर श्री नरेश म्हस्के, सुयश कला क्रीडा मंडळ अध्यक्ष मधुसूदन राव, हेमाद्री अंकाच्या सहसंपादिका सौ. अश्विनी सुर्वे, आपला कट्टा संस्था अध्यक्षा सौ. ममता भोसले, मोडी अभ्यासक सौ. सरिता शिंदे व संदेश सोनावळे या प्रसंगी उपस्थित होते. मोडी लिपीच्या जतन संवर्धनासाठी सुरु असलेली हि मोहीम अविरत सुरु आहे याची माहिती मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आली, त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.

 माघ महिन्यातील श्री गणेश जयंती याचे औचित्य साधून सदर अंक हा विविध आरत्या लिहून सज्ज केला आहे. सदर अंका मधील आरती संग्रहाचे लिखाण हेमाद्री हस्तलिखिताचे संपादक श्री पंकज भोसले यांनी केले आहे. सदर ई - अंकाची प्रत खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे 

https://drive.google.com/file/d/1NCCeUp472PWBNxODBY2OGiEWN6xqQA-U/view?usp=share_link

जास्तीत जास्त मोडी वाचकां पर्यंत पोचण्यासाठी केलेला एक प्रयत्न...!

आवडल्यास नक्की प्रतिक्रिया नोंदवा...hemadri.modilipi@gmail.com

धन्यवाद....

©हेमाद्री