*हेमाद्री मोडीलिपीतील हस्तलिखित अंक - ९ प्रकाशन*
हेमाद्री या मोडीलिपीतील
हस्तलिखिताच्या नवव्या अंकाचे
प्रकाशन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री *मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या हस्ते रविवार
दिनांक २२.०१.२०२३ रोजी करण्यात आले. सुयश कला-क्रीडा मंडळ, श्री सिद्धिविनायक
मंदिर ठाणे(पूर्व) यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमाला – २०२३ या कार्यक्रमात हा
प्रकाशन समारंभ पार पडला. हेमाद्री हस्तलिखिताचा हा ९वा अंक असून सदर अंक विविध
आरत्या लिहून संपन्न केला आहे. कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक श्री महेश काळे,
सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर, ठाणे महापौर श्री नरेश म्हस्के, सुयश कला
क्रीडा मंडळ अध्यक्ष मधुसूदन राव, हेमाद्री अंकाच्या सहसंपादिका सौ. अश्विनी
सुर्वे, आपला कट्टा संस्था अध्यक्षा सौ. ममता भोसले, मोडी अभ्यासक सौ. सरिता शिंदे
व संदेश सोनावळे या प्रसंगी उपस्थित होते. मोडी लिपीच्या जतन संवर्धनासाठी सुरु
असलेली हि मोहीम अविरत सुरु आहे याची माहिती मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आली, त्यांनी
या कार्यास शुभेच्छा दिल्या.

माघ महिन्यातील श्री गणेश जयंती याचे औचित्य साधून सदर अंक हा विविध आरत्या लिहून सज्ज केला आहे. सदर अंका मधील आरती संग्रहाचे लिखाण हेमाद्री हस्तलिखिताचे संपादक श्री पंकज भोसले यांनी केले आहे. सदर ई - अंकाची प्रत खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे
https://drive.google.com/file/d/1NCCeUp472PWBNxODBY2OGiEWN6xqQA-U/view?usp=share_link
जास्तीत जास्त मोडी
वाचकां पर्यंत पोचण्यासाठी केलेला एक प्रयत्न...!
आवडल्यास नक्की
प्रतिक्रिया नोंदवा...hemadri.modilipi@gmail.com
धन्यवाद....
©हेमाद्री